प्रस्तावना:
तुम्ही आनंदी जीवन कस जगता? काय आहे तुमच्या आनंदी जीवनाचे सुत्र?
खर सांगायच तर आपण आनंदी रहाणच विसरून गेलो आहोत. आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सकाळ पासुन ते रात्री पर्यंत नुसत घाण्याला जुंपलेल्या बैला सारख राबतोय प्रत्येकाला या स्पर्धात्मक युगात जिंकायचं आहे. आणि जगायचं ही आहे. पण या सगळ्यामध्ये प्रत्येक जण स्वतःसाठी वेळ काढणचं विसरत चालले आहोत.
जरा थोड्या वेळ शांत बसा स्वतः मध्ये डोकावून बघा. खरच इतक्या धावपळीची राब राब राबण्याची गरज आहे का? आपल्या मनालाच विचारा. "नेमका माझा आनंद कशात आहे?"
आपल्याला माहीत असत. प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात असतेच अस नाही तरी सुद्धा त्या गोष्टींच्या आपण मागे धावत असतो. काहीतरी मिळवण्याच्या हव्यासा पाई आपला स्वतःसाठीचा वेळ आपला आनंद गमावून बसतो. आणि मग शेवटी विचार करण्याची वेळ येते. "हे मी आधीच केलं असत तर."
याच साठी आहे आपला आनंद मिळवण्याचे सुत्र:
वाचन करा :
अस म्हणलं जात. "वाचाल तर वाचाल" अगदी बरोबर आहे. वाचन केल्याने आपल्याला नव नवीन माहिती मिळते. आपल्या साहित्य विश्वात इतकी सुंदर साहित्यिक वाचनीय पुस्तक आहेत की आपल्याला फक्त त्यातून माहितीच मिळत नाही तर आपलं जीवन देखील समृद्ध होत. म्हणूनच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वाचन करत जा. पण मोबाईल वर नाही तर पुस्तक विकत घेऊन. जेणेकरून तुमच्या आवडीच्या पुस्तकांचा तुमच्याकडे संग्रह देखील होईल.
फिरायला जा:
एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपल्या प्रियजनांबरोबर छान फिरायला जा. त्यामुळे तुमची दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतील आणि फिरायला गेल्याने मन देखील प्रसन्न होईल. आपल्या धकाधकीच्या जीवनात कधी कधी सुट्टीचा आनंद घेतल्याने कामाला ही हुरूप येतो. त्यामुळे काम पटापट होतात.
ध्यान धारणा करा:
दररोज सकाळी ध्यान (मेडिटेशन) करा. ध्यानामुळे आपल्या आयुष्यातील ताण तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच एक नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे दिवसभर मन सकारात्मक रहात.
रोज नवीन काही तरी करा:
आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वतःसाठी थोडासा वेळ काढून रोज नवीन काही तरी करा. मित्रांना भेटायला जा एखादा छानसा चित्रपट बघा आपल्या जोडीदाराला एखादं छानसं सरप्राईज गिफ्ट द्या. वडीलधाऱ्या व्यक्तींबरोबर आपल्या मुलांबरोबर वेळ घालवा. पण काही तरी करा.
रोजनिशी लिहा:
दररोज रात्री सकाळपासून आपल्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या एका डायरीत लिहून ठेवा आणि त्या करता परमेश्वराचे आभार माना.
गाणी ऐका:
आपल्या संगीत विश्वात आपल्या गायकीने बऱ्याच लोकांनी संगीत क्षेत्राला अजरामर केल आहे. त्याचा उपयोग करा आपल्या मनाला आनंद देईल अशी आवडती गाणी ऐका त्यामुळे आपलं मन आनंदी तर राहातच तसेच प्रसन्न ही राहात.
शेवटी आपल्याला आनंदी जीवन मिळत नसत तर आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला मिळवावा लागतो. हं पण आनंद मिळवायच्या पद्धती आणि तो आनंद आयुष्यात टिकवायच्या पद्धती या मात्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात इतकच.