पाहता क्षणी तुला
भेटण्या अधीर मन झाले
तुझी हाक ऐकता
मी बावरी झाले.
तुझ्यात गुंतता हे हृदय
मी माझेच भान हरपुन गेले
तुझ्या आठवणीत माझी मीच
न राहिले
जीवाला तुझी ओढ लागता
तुझ्यात जीव गुंततो
तुझी मनाला चाहूल लागता
जीव बावरा होतो.
हीच असते का प्रित
की आहे भास सारा
तु जवळ येता क्षणी
जगाचा विसर पडे मला.