बाजारात ओले काजू दिसले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.; पण त्या ओल्या काजूंची भाजी चविष्ट (Olya kajuchi bhaji ) होण्यासाठी नेमकी कोणती कृती वापरायची, हे अनेकांना उमगत नाही. त्यासाठीच ही रेसिपी काजूच्या चविष्ट भाजीची! (Olya kajuchi bhaji )
अनेकांना ढाब्यावर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला आवडते. अशीच चव तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांमधून मिळाली तर? चला तर मग ‘ओल्या काजूची भाजी’ अशा प्रकारे बनवा.
Servings
५ minutes
Preparing Time
३० minutes
Cooking Time
३० minutes
Calories
kcal
INGREDIENTS
-
अर्धा किलो ओले सोललेले काजू
-
एक कांदा मध्यम आकाराचा
-
मध्यम आकाराचे दोन बटाटे
-
एक वाटी तेल
-
एक छोटा चमचा हळद
-
तीन चमचे मालवणी मसाला
-
वाटणासाठी दोन कांदे
-
अर्धी वाटी ओला खोवलेला नारळ
-
अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस
-
अर्धा इंच आलं
-
सोललेल्या लसणाच्या पाच पाकळ्या
-
अर्धा चमचा बडीशेप
-
तीन-चार काळे मिरे
-
लवंग
-
दालचिनीचा छोटा तुकडा
-
दगडफूल
-
थोडी खसखस
-
तमालपत्राची एक-दोन पानं.
DIRECTION
-
तीन कांदे उभे कापून ते तेलावर तांबूस रंगावर भाजून घ्या
-
ओलं आणि सुकं खोबरंही वेगवेगळं भाजून घ्या
-
सुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि वर म्हटलेला खडा मसाला टाका
-
नंतर हे सर्व भाजलेलं साहित्य मस्त बारीक वाटून घ्या
-
वाटण तयार झाल्यावर एका पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून ते कडकडीत तापल्यावर त्यात उरलेला एक कांदा बारीक चिरून टाका
-
कांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्या
-
कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाका
-
नंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळा
-
थोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाका
-
चवीपुरतं मीठ टाका
-
झाली काजूची भाजी तयार
NOTES
The post Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी appeared first on पुढारी.
from युथवर्ल्ड | पुढारी https://ift.tt/UO5DrjF
via मराठी कट्टा